बारामुल्ला -भारतीय लष्करातर्फे विशेष पोलीस अधिकारी (SPO) बिलाल अहमद यांना आदरांजली वाहण्यात आली. बिलाल अहमद यांना उत्तर काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत वीरमरण आले.
बारामुल्ला चकमक : भारतीय लष्करातर्फे एसपीओ बिलाल अहमद यांना आदरांजली - indian army pays tribute to SPO Billal Ahmad
२० ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता चकमक सुरू झाली होती. ती दुसऱ्या दिवसापर्यंत सुरूच होती. ही चकमक सुरू असताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरू होती.
बारामुल्ला चकमक
२० ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता चकमक सुरू झाली होती. ती दुसऱ्या दिवसापर्यंत सुरूच होती. ही चकमक सुरू असताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरू होती. ५ ऑगस्टपासून भारतीय लष्कराकडून करण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेसाठी दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू आहे.