श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील दक्षिणेकडील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका मेजर पदावरील अधिकाऱ्याला वीरमरण आले. तर, आणखी एक याच पदावरील अधिकारी आणि २ सैनिक जखमी झाले आहेत. अचबल परिसरात ही चकमक सुरू आहे.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका मेजरला वीरमरण, ३ जखमी - martyred
जखमींना श्रीनगरमधील ९२ बेस लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू असताना त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला.
मेजरला वीरमरण
जखमींना श्रीनगरमधील ९२ बेस लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू असताना त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. या भागात आणखी दहतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची त्यांचा शोध सुरू आहे.