नवी दिल्ली - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा यांना वीरमरण आले. मेजर केतन यांचे पार्थिव मेरठमधील त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरचे शोकाकुल वातावरण न पहाववणारे होते. लष्कराचे जवान घरी पोहोचताच केतन शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. हुतात्मा केतन यांच्या आईने तर 'माझा सिंहासारखा मुलगा कुठे आहे,' ते सांगा, असे म्हणत केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा होता.
‘माझा सिंहासारखा मुलगा कुठे गेला?’, हुतात्मा जवानाच्या आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश - major ketan sharma
सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी एकीकडे शोक व्यक्त केला जात असून संतापही जाहीर होत आहे.
मेजर शर्मांना वीरमरण आल्याचे कळताच घरात आकांत झाला. संपूर्ण कुटुंब शोकावस्थेत बुडाले. सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी एकीकडे शोक व्यक्त केला जात असून संतापही जाहीर होत आहे. मेजर केतन यांच्या काकांनी सरकारने एकदाच योग्य उत्तर देत ही नेहमीची लढाई बंद केली पाहिजे असे म्हटले आहे.
२५ लाखांची आर्थिक मदत जाहीर
यादरम्यान राज्य सरकारने शहीद मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबासाठी २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. एका रस्त्याचं नामकरण करत त्याला मेजर केतन शर्मा यांचं नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.