महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीर खोऱ्यातील ६५ टक्के औषधांची दुकाने सुरू आहेत - प्रशासन - औषधांचा तुटवडा काश्मीर

श्रीनगरमधील १ हजार ६६६ दुकानांपैकी १ हजार १६५ औषध दुकाने सुरू आहेत. तसेच, काश्मीर खोऱ्यातही ६५ टक्के औषधाची दुकाने सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

काश्मीर

By

Published : Aug 25, 2019, 11:38 AM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्यामध्ये अनेक भागांत संचारंबदी लागू आहे. त्यामुळे औषधांचा तुटवडा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, सरकारने राज्यामध्ये किती औषधाची दुकाने सुरू आहेत याची माहिती दिली आहे. राज्यातील ६५ टक्के औषधाची दुकाने सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

श्रीनगरमधील १ हजार ६६६ दुकानांपैकी १ हजार १६५ औषध दुकाने सुरू आहेत. तसेच काश्मीर खोऱ्यातही ६५ टक्के औषधाची दुकाने सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

याबरोबरच सर्व निर्देशित केलेली ३७६ औषधे सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ६२ अतिमहत्त्वाची औषधेही राज्यामध्ये उपलब्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच तीन व्यक्ती जम्मू आणि चंदीगड येथे तत्काळ मदतीसाठी ठेवण्यात आले आहे.

मागील २० दिवसांपासून काश्मीर राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर सरकारने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details