महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये सापडले तोफगोळे

सांबा येथील सांगवडी गावाजवळ पोलिसांना तोफेचे तीन गोळे सापडले. येथील ग्रामस्थांनी काही संशयास्पद वस्तू दिसल्याने येथील पोलिसांना सूचना दिली. पोलीस आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जम्मू-काश्मीर

By

Published : Oct 7, 2019, 6:58 PM IST

सांबा - जम्मू-काश्मीरमधील सांबा येथील सांगवडी गावाजवळ पोलिसांना तोफेचे तीन गोळे सापडले आहेत. येथील ग्रामस्थांनी काही संशयास्पद वस्तू दिसल्याने येथील पोलिसांना सूचना दिली. पोलीस आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या तोफगोळ्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, हे जुने असल्याचे तसेच, पावसामुळे खराब झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी खबरदारी म्हणून या भागात शोध मोहीमही राबवली. मात्र, आणखी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी आर्टिकल ३७० आणि ३५ ए यंदा ५ ऑगस्टला हटविण्यात आली. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात आले आहे. येथे फुटीरतावादी संघटनांकडून अंतर्गत संघर्ष पेटविण्याची तसेच, पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची भीती आहे. या कारणाने येथे प्रत्येक संशयित वस्तू, घटना आणि व्यक्तींबाबत कमालीची सावधगिरी बाळगली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details