चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जागा मिळवण्यात तिसऱ्या स्थानावर असलेला जननायक जनता पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काँग्रेस दोघांकडूनही आमंत्रण असल्याचे जेजपी पक्षाचे अध्यक्ष सरदार निशांत सिंह यांनी सांगितले आहे. मात्र, निवडून आलेल्या उमेदवारांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सिंह म्हणाले.
हेही वाचा -हरियाणात भाजपला जनतेनं नाकारलं, तरी जुगाड करुन सरकार स्थापन करतील - कमलनाथ
जनाधार भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय काय असले हे बैठकीनंतर स्पष्ट होईल, असे सिंह म्हणाले. जेजेपी पक्ष आज बैठक घेणार असून कोणाला पाठिंबा द्यायचा याबबात निर्णय घेण्यात येणार आहे. भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. तर एकीकडे सर्व विरोधाकंनी भाजप विरोधात एकत्र येवून सरकार स्थापन करावे, असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपेंद्र चौटाला यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -चिदंबरम तुरुंगातच साजरी करणार दिवाळी, न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ
भाजप आणि काँग्रेस पक्षाला विधानसभेत बहुमत न मिळाल्याने जेजेपी पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जेजेपी पक्षाची स्थापना दुष्यंत चौटाला यांनी नव्यानेच स्थापन केला आहे. दुष्यंत चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे नातू आहेत. तर चौधरी देवी लाल यांचे पुणतू आहेत. चौधरी देवी लाल व्ही पी. सिंग सरकारमध्ये उप-पंतप्रधान होते. इंडीयन नॅशनल लोकदल पक्षातून बाहेर पडून त्यांनी जेजेपी पक्षाची स्थापना केली.