नवी दिल्ली -रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन बाजारात आणत असून तो 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत असेल. जवळपास 20 ते 25 कोटी मोबाईल विक्रीचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे. प्रामुख्याने जे सध्या 2G फोनचा वापर करत आहेत त्यांना हा फोन विकण्याचा कंपनीचा मानस आहे.
जिओचे ५जी स्मार्टफोन होतोय लॉंच, त्याची किंमत आहे....
रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन घेऊन येतोय. हा 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.
जिओ पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन लाँच करणार आहे. लाँच केल्यानंतर जेव्हा फोनची विक्री वाढेल, तेव्हा जिओ या फोनची किंमत 2500 ते 5000 रुपये करू शकते. रिलायन्सच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारत 2G मुक्त करण्याची आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत 5G फोन विकण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या भारतात 27,000 रुपये किमतीमध्ये 5G फोन उपलब्ध आहेत.
जिओ अशी पहिली कंपनी आहे की, जिने यापूर्वीही कमी किमतीत 4G फोन विकले होते. ज्यात कंपनीने या फोनसाठी ग्राहकांकडून 1500 रुपये परत करण्याची ग्वाही दिली होती. जिओचा हा फोन लाँच करण्यामध्ये गुगलने केलेल्या 33,737 कोटींच्या गुंतवणूकीचा फायदा होणार असल्याचेही अंबानी यांनी जाहीर केले आहे. गुगलकडून अँड्रॉईड बेस स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी रिलायन्सने पार्टनरशिप केली आहे.