जींद (हरयाणा)- कोरोना विषाणुमुळे सगळीकडे स्वच्छता आणि सोशल डिस्टंन्सद्वारे काळजी घेण्यात येत आहे. शहरातील पोलीस ठाण्यात एसएसओ दिनेश कुमार यांनी आयडिया करून सॅनिटायझिंग मशीन लावले आहे.
जिंद पोलिसांची भन्नाट आयडिया, पंख्यापासून बनवले सॅनिटाईझ करणारे मशीन - हरियाणा कोरोना लॉकडाउन
ठाण्यात आत जाणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यासह तक्रारकर्त्याला या मशिनद्वारे सॅनिटाईझ करून आत पाठवण्यात येत आहे. या पोलीस ठाण्यात जवळपास 50 कर्मचारी आहेत. त्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी ही मशीन लावण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यासह तक्रारकर्त्याला या मशिनद्वारे सॅनिटाईझ करून आत पाठवण्यात येत आहे. या पोलीस ठाण्यात जवळपास 50 कर्मचारी आहेत. त्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी ही मशीन लावण्यात आली आहे.
दिनेश कुमार यांनी ठाण्याबाहेर सॅनिटायझर मशीन म्हणून लग्न-समारंभात लावण्यात येणारा पंखा लावला आहे. या पंख्यासमोर एक रेडीएटरसारखा बॉक्स लावला आहे. त्यामध्ये लावण्यात आलेल्या पंपाद्वारे लोकांना सॅनिटाईझ करण्यात येत आहे. या पाण्यात सॅनिटाईझ करण्यासाठी सोडियम हाइपोक्लोराइट मिसळले आहे. ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रविंद्र यांनी सांगितले, की सोशल मीडियावर एक व्हिडीओ बघून त्यांना ही आयडीया सुचली. त्यानुसार पंखा आणि सॅनिटाईझ करण्यासाठी औषध वापरून हा प्रयोग केला.