रांची - आपल्या देशात कोणताही मोठा समारंभ असला, की त्यासोबत लोकांचे जेवण हे अपरिहार्यच असते. मोठ्या प्रमाणात लोकांना जेवण द्यायचे असेल, तर कमी खर्च व्हावा म्हणून प्लास्टिक किंवा थर्माकॉलच्या थाळ्या वापरणे आता अगदी सामान्य झाले आहे. मात्र हेच प्लास्टिक आपल्यासाठी धोकादायक ठरत आहे.
देशात सुरू असलेल्या प्लास्टिकविरोधी लढाईमध्ये, झारखंडच्या जमशेदपूरजवळील जुगसलाई नगर परिषदेचाही मोठा वाटा आहे. स्वयंसेवकांच्या ३७ समूहांच्या मदतीने, या नगर परिषदेने भांड्यांची बँक सुरू केली आहे. या विशेष बँकेच्या माध्यमातून, लोकांना समारंभांसाठी अगदी नाममात्र किंमतीमध्ये स्टीलची भांडी भाड्याने देण्यात येतात.