पलामू -झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील पिपरा पोलीस ठाणे परिसरात भाजप नेते मोहन गुप्ता यांची माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४७ वर्षीय गुप्ता यांच्या ८ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांच्या आणखी एका साथीदाराचा मृत्यू झाला. तर, ३ जण गंभीर जखमी झाले.
पलामूमध्ये माओवाद्यांकडून भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या - माओवाद्यांकडून भरबाजारात भाजप नेत्याची हत्या
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गुप्ता पिपरा ब्लॉकच्या प्रमुखांचे पतीही आहेत. ते अनेक वर्षांपासून माओवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांच्या हत्येनंतर या भागात पत्रके फेकून माओवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

शनिवारी सायंकाळी उशिरा गुप्ता पिपरा बाजारात फेरफटका मारत होते. तेवढ्यातच माओवाद्यांनी बाईकवरून या ठिकाणी येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१२ मध्येही गुप्ता यांच्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता.