झारखंड -राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणी न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालूंना अखेर जामीन मंजूर, तरीही मुक्काम तुरुंगातच - RJD leader
लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणी न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा कालावधी संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांची ही याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे.
न्यायालयाने लालू प्रसाद यांना आपले पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे. लालू यांच्यावर सहा खटले चालू आहेत. त्यापैकी चार खटल्याप्रकरणी त्यांना शिक्षा मिळाली आहे. मात्र त्यापैकी इतर दोन खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला असला तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे.