महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडमध्ये अडकलेल्या ३८ प्रवाशी मजुरांना घेऊन पहिली बस पश्चिम बंगालसाठी रवाना - 38 laborers from Bengal

गुरुवारी रात्री उपआयुक्त वरुण रंजन यांनी ३८ मजुर प्रवाशी जाणाऱ्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवला. ही बस पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद या जिल्ह्यात जाणार आहे.

झारखंडवरुन ३८ कामगार प्रवाशी असलेली पहिली बस पश्चिम बंगालसाठी रवाना
झारखंडवरुन ३८ कामगार प्रवाशी असलेली पहिली बस पश्चिम बंगालसाठी रवाना

By

Published : May 1, 2020, 11:09 AM IST

साहिबगंज - झारखंड सरकार सुरुवातीपासून परराज्यात फसलेल्या झारखंडच्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे झारखंडमध्ये अडकून पडलेल्या इतर राज्यातील मजुरांनाही त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी करत आहे. या प्रयत्नांची सुरुवात झारखंडच्या साहिबगंज येथून पश्चिम बंगालसाठी गुरुवारी पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या बसने झाली.

झारखंडमध्ये अडकलेले ३८ मजुर पश्चिम बंगालसाठी रवाना

साहिबगंज येथून गुरुवारी रात्री झारखंडमध्ये अडकलेल्या ३८ नागरिकांना त्यांच्या पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बसद्वारे पाठवण्यात आले. झारखंड येथून परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणारी ही पहिली बस आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये अडकलेल्या २८ मजुरांनाही परत झारखंडमध्ये आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या बसला उपआयुक्त वरुण रंजन यांनी हिरवी झंडी दाखवत रवाना केले. यावेळी, माहिती देताना ते म्हणाले, परराज्यातील ३८ मजुरांना घेऊन जाणारी ही पहिली बस आहे. यातील सर्व मजुरांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. ते सर्व ठणठणीत बरे आहेत. त्यांच्यासाठी बसमध्ये खाण्यापिण्याची सर्व सुविधा करण्यात आली आहे. यासोबतच, युपी-बिहारवरुन आलेल्या मजुरांनाही त्यांच्या राज्यात सोडण्याकरता अन्य ४ बसेसची सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंगालच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी झारखंडचे २८ मजुर पश्चिम बंगालमध्ये अडकल्याची माहिती दिली. त्या मजुरांना याच बसने परत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुर वर्गाला त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच, परराज्यात फसलेल्या झारखंडच्या नागरिकांना परत बोलवण्यात येईल अशी माहिती उपआयुक्त वरुण रंजन यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details