महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडही भाजपच्या हातून निसटलं.. रघुवर दास यांनी राज्यपालांना सोपवला राजीनामा - झारखंड निकाल

आज झारखंडच्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा आज निकाल आहे. राज्यातील ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल  आघाडीने 47 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर भाजपने 25 जागा जिंकल्या. काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

By

Published : Dec 23, 2019, 6:47 AM IST

Updated : Dec 23, 2019, 11:18 PM IST

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीने 47 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर भाजपने 25 जागा जिंकल्या. तसेच एजेएसयु या पक्षाने 2 जागांवर तर जेव्हिएम पक्षाने 3 जागांवर विजय मिळवला. 4 जागा इतर पक्षांनी काबीज केल्या आहेत. जेएमएम काँग्रेस आणि राजद आघाडीला जनतेनं कौल दिला असल्याने राज्यात या आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन असल्याचेही जवळपास निश्चित झाले आहे.

08.20 PM : रघुवर दास यांनी राज्यपालांना सोपवला राजीनामा

5.16 PM : भाजपने 16 जागांवर विजय प्राप्त केला असून 10 जागांवर आघाडीवर आहे. तर जेएमएमने 28 मतदारसंघात विजय प्राप्त केला असून 17 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

3.20 PM :झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास पिछाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार सरयू राय 7484 मतांनी आघाडीवर आहेत.

3.15 PM :भाजपला धक्का,जेएमएम आघाडीची विजयाकडे घोडदौड

3.00 PM :झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन बरहैत मतदारसंघातून विजयी..

3.00 PM : धनबाद मतदारसंघातून भाजपचे राज सिन्हा विजयी, टुंडी मतदारसंघातून जेएमएमचे मथुरा प्रसाद माहतो विजयी, डुमरी मतदारसंघातून जेएमएमचे जगरनाथ माहतो विजयी, माजगावच मतदारसंघातून जेएमएमचे निरल पूर्ती विजयी..

2.43 PM : तोरपा मतदारसंघातून भाजपचे कोचे मुंडा विजयी. खुंती मतदारसंघातून भाजपचे नीलकंठ मुंडा विजयी. तर, कोलेबिरा मतदारसंघातून काँग्रेसचे नमन कोंगरी विजयी..

2.30 PM : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास अजूनही ४,६४३ मतांनी पिछाडीवर

2.15 PM :हेमंत सोरेन हे डुमका मतदारसंघातून ४६१ मतांनी पिछाडीवर, तर बरहैतमधून ९,९४८ मतांनी आघाडीवर..

1.41 PM : येत्या फेऱ्यांमध्येही १५००-२००० मतांनी मी पुढे राहील, कदाचित ३०,००० मतांनी माझा विजय होऊ शकतो - सरयू राय, अपक्ष

1.36 PM : काँग्रेसपाठोपाठ भाजप आणि एजेएसयूनेही खाते उघडले आहे. चंदनकियारी मतदारसंघातून भाजपचे अमर बाऊरी, तर गोमियामधून एजेएसयूचे लंबोदर महतो विजयी झाले आहेत..

1.17 PM :काँग्रेसने खाते उघडले, बर्मोमधून काँग्रेसचे राजेंद्र सिंह विजयी..

1.13 PM : एजेएसयूचे सुदेश महतो सिल्लीमधून १०,४०० मतांनी आघाडीवर..

1.11 PM : बर्मो मतदारसंघातून लढणारे काँग्रेसचे राजेंद्र सिंह हे २४ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे..

1.00 PM : जेएमएम आघाडी ४४, भाजप २६, इतर ५ तर एजेएसयू आणि जेव्हीएम प्रत्येकी तीन मतदारसंघांमध्ये आघाडीवर..

12.44 PM :झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हे ७७१ मतांनी पिछाडीवर..

12.43 PM :ईव्हीएममधील बिघाडामुळे कोलोबेरामधील पाच केंद्रांवरील मतमोजणी थांबली..

12.33 PM :जेएमएमचे हेमंत सोरेन डुमका दोन्ही मतदारसंघांतून आघाडीवर.. डुमक्यातून २,४६३ तर बरहैतमधून ८,६१६ मतांनी पुढे..

12.30 PM :राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार कमलेश कुमार सिंह हुसैनाबादमधून आघाडीवर..

12.15 PM : काँग्रेसचे राजेंद्र सिंह १५ हजार मतांनी पुढे, बर्मो मतदारसंघातून लढवत आहेत निवडणूक..

11.53 AM : सध्याचे आकडे हे सुरुवातीचे आहेत, अजून निकाल जाहीर झाला नाही. सरयू राय यांच्यामुळे मला काहीही धोका नाही. त्यांचा प्रभाव असता तर मला आत्ता मिळत आहेत ती मते मिळाली नसती - रघुबर दास (मुख्यमंत्री, झारखंड)

11.37 AM :झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेव्हीएमचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी हे धनवरमधून ५,९८० मतांनी आघाडीवर..

11.30 AM :जेएमएम आघाडी ४१, भाजप २६, एजेएसयू ६ तर जेव्हीएम आणि इतर प्रत्येकी ४ जागांवर पुढे. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास १,४४९ मतांनी आघाडीवर..

11.30 AM :झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि जेएमएम आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन हे बरहैतमधून ५,३१९ मतांनी आघाडीवर, तर डुमकामधून ५,३८१ मतांनी पिछाडीवर..

11.00 AM :जेएमएम-काँग्रेस-राजद आघाडी ४५, भाजप २५, एजेएसयू ५, जेव्हीएम ४ आणि इतर ३ जागांवर पुढे..

10.30 AM : काँग्रेस-जेएमएम आघाडी ४२, भाजप २७ तर जेव्हीएम, एजेसयू आणि इतर प्रत्येकी ४ मतदारसंघांतून आघाडीवर..

10.00 AM : सकाळी दहा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये भाजप ३३, काँग्रेस-जेएमएम ३९, एजेएसयू २, जेव्हीएम ४ तर इतर ३ मतदारसंघांतून आघाडीवर..

9.45 AM :मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण; भाजप ३४ तर काँग्रेस-जेएमएम ३७ जागांवर पुढे. डुमका मतदारसंघातून भाजपच्या लुईस मरांडी आघाडीवर, तर जेएमएमचे हेमंत सोरेन पिछाडीवर..

9.30 AM : सर्व जागांवरील कल समोर, भाजप ३२ तर काँग्रेस-जेएमएम ३६ जागांवर पुढे..

9.00 AM :८१ पैकी ७६ मतदारसंघांमधून भाजप २६ तर जेएमएम आघाडी ३७ जागांवर पुढे; एजेएससूही सहा मतदारसंघातून आघाडीवर..

8.00 AM : मतमोजणीला सुरुवात, भाजप दोन तर जेएमएम आघाडी पाच जागांवर पुढे..

रांची- झारखंड विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. झारखंडमध्ये 81 विधानसभा मतदारसंघामध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. 81 जागांसाठी तब्बल 1 हजार 216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. झारखंड राज्यात 81 विधानसभा मतदारसंघात 1 हजार 216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी 128 महिलांचा समावेश होता.

  • पक्षानुसार उमेदवार
  • भाजप - 79
  • जेवीएम - 81
  • काँग्रेस - 31
  • जेएमएम - 43
  • आजसू - 53
  • अपक्ष - 368
  • इतर - 561

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस यांची आघाडी असणार आहे.

हेही वाचा - Video : 'या कपड्यांविषयीच तर मोदी बोलत नाहीत ना?'

Last Updated : Dec 23, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details