रांची -झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले. आज ५६ लाख मतदार १७ जागांवरील उमेदवारांचे भविष्य निश्चित करतील. ८ जिल्ह्यांतील ८१ मतदारसंघांपैकी १७ जागांसाठी आज ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२ महिलांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये दोन अनुसूचित जातींच्या आणि एका अनुसूचित जमातीच्या जागेसाठी मतदान होईल.
झारखंड विधानसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू - झारखंड विधानसभा निवडणूक
आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. आज आजसूचे नेते सुदेश महतो, नगर विकास मंत्री सी. पी. सिंह, शिक्षण मंत्री नीरा यादव आणि जेव्हीएमचे नेते बाबूलाल मरांडी हे महत्त्वाचे नेते मैदानात आहेत.

पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ७ डिसेंबरला झाले. चौथ्या टप्प्यातील मतदान १६ डिसेंबरला, पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० डिसेंबरला होईल. मतमोजणी २३ डिसेंबरला होईल. ५ जानेवारीला झारखंडच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.