रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८१ विधानसभेच्या जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये राज्याच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. राज्यामध्ये आचारसंहीता लागू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
पाच टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
- १३ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान
- २० जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान
- १७ जागांसाठी १२ डिसेंबरला मतदान
- १५ जागांसाठी १६ डिसेंबला मतदान
- १६ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान
एकूण ८१ जागांसाठी २३ डिसेंबरला मतदान
झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० ला पूर्ण होत आहे. त्याआधीच नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपला ३१.१ टक्के मते मिळाली होती. तसेच ३७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसला १०.५ टक्के मते मिळाली होती आणि ७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. झारखंड विकास मोर्चा पक्षाला १० टक्के मतांसह ८ जागांवर विजय मिळवला होता. ऑल झारखंड स्टुडंट युनियन (आजसू) पक्षाने ३.७ टक्के मतांसह ५ जागा जिंकल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने २०.४ टक्के मतांसह १९ जागा जिंकल्या होत्या. भाजपने आजसू आघाडीने सत्ता स्थापन केली होती.
२०१४ साली झारखंड विधानसभा निवडणुका ५ टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी २ कोटी ५२ हजार ८०८ अधिकृत मतदार होते. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.