रांची - झारंखड विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज (शनिवारी) पार पडला. २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी ६२. ४० टक्के मतदान झाले. राज्याच्या निवडणुका ५ टप्प्यांमध्ये होणार असून तीन टप्पे अजून बाकी आहेत. मतदानावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्वात जास्त मतदान (७४.४४ टक्के) बहरागोडा विधानसभा मतदार संघात झाले. तर सर्वात कमी मतदान (४६.४० टक्के) जमशेदपूर पश्चिम मतदार संघात झाले. नक्षलावाद्यांना न घाबरता मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही आज मतदान केले.
मतदान झाल्यानंतर माघारी परतत असेलल्या पोलीस ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना खुंटी येथील मारंगबुरू भागामध्ये घडली. पोलिसांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. घटनदाट जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. एका जवानाला गोळी लागल्याची माहिती पुढे आली आहे.