नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द करण्यसाठी काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. यातच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. पुर्नविचार याचिका दाखल केलेल्या 6 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.