महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JEE-NEET परीक्षा पुढे ढकलणार नाही; 'एनटीए'ने जाहीर केल्या तारखा..

जेईई (मेन्स) आणि नीट (यूजी) या प्रवेश परीक्षांची तारीख पुढे न ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. त्यानुसार, जेईई मेन्स ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर; तर नीट (यूजी) ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे....

JEE (Main) exam to be held from 1st to 6th September and NEET (UG) on 13th September
जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलणार नाही; 'एनटीए'ने जाहीर केल्या तारखा..

By

Published : Aug 21, 2020, 9:21 PM IST

नवी दिल्ली : जेईई (मेन्स) आणि नीट (यूजी) या प्रवेश परीक्षांची तारीख पुढे न ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. त्यानुसार, जेईई मेन्स ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर; तर नीट (यूजी) ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन जुलैला या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला होता. त्यानंतरही देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे पाहून कित्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

१७ ऑगस्टला या याचिकांवर सुनावणी घेत, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती. कोरोनासारखी महामारी पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

त्यानंतर आज पुन्हा यासंदर्भात एक बैठक पार पडली, ज्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या.

हेही वाचा :'नीट' पुढे ढकला, अन्यथा आत्महत्यांमध्ये वाढ होईल; सुब्रमण्यम स्वामींचे पंतप्रधानांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details