नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी आज जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख जाहीर केली. ३ जुलै २०२१ला ही परीक्षा होणार असल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या तयारीसाठी आता पुरेसा वेळ आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करावा असेही त्यांनी सांगितले.
७५ टक्केंची अट हटवली..
पोखरियाल यांनी सांगितले, की कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची ७५ टक्के गुणांची अट हटवण्यात आली आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आयआयटी खड़गपूर या परीक्षेचे आयोजन करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले.