महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

११ नव्हे, १४ आमदारांचे राजीनामे? वरिष्ठ जेडीएस नेत्याचा दावा - congress

विश्वनाथ यांनी यामागे भाजपचा हात असल्याविषयी विचारले असता त्यांनी 'मला भाजपविषयी माहीत नाही. आम्ही स्वतःहून राजीनामा दिला आहे. आमच्यावर 'ऑपरेशन कमळ'चा प्रभाव नाही, कोणाचाही प्रभाव नाही. आम्ही वरिष्ठ आमदार आहोत. आमच्याकोणीही प्रभाव टाकू शकत नाही,' असे ते म्हणाले.

एच. विश्वनाथ

By

Published : Jul 6, 2019, 8:05 PM IST

बंगळुरु - कर्नाटकात सध्या राजकीय वादळ आले आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण ११ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, आता जेडीएसचे वरिष्ठ नेते आणि आमदार एच. विश्वनाथ यांनी १४ आमदारांनी राजीनामे दिल्याचा दावा केला आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे कर्नाटकातील आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.

'आम्ही कर्नाटकच्या विधानसभा सभापतींना राजीनामे सुपूर्त केले आणि त्यांना स्वीकारण्याची विनंती केली. त्यांनी मंगळवारपर्यंत याविषयी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या सरकारने कामे करताना सर्वांना विश्वासात घेतले नाही,' असे विश्वनाथ म्हणाले. सरकार व्यवस्थित काम करत नसल्यामुळे त्यांच्यासह इतर आमदारांनी राजीनामे दिल्याचा दावा त्यांनी केला. १४ आमदारांनी एकत्रितपणे राजीनामे दिल्याचे ते म्हणाले. चौदा आमदारांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याच्या माहितीला विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी दुजोरा दिलाय.

'ऑपरेशन कमळ'चा प्रभाव?विश्वनाथ यांनी यामागे भाजपचा हात असल्याविषयी विचारले असता त्यांनी 'मला भाजपविषयी माहीत नाही. आम्ही स्वतःहून राजीनामा दिला आहे. आमच्यावर 'ऑपरेशन कमळ'चा प्रभाव नाही, कोणाचाही प्रभाव नाही. आम्ही वरिष्ठ आमदार आहोत. आमच्याकोणीही प्रभाव टाकू शकत नाही,' असे ते म्हणाले. शनिवारी नाट्यमयरीत्या झालेल्या काँग्रेस-जेडीएस सदस्यांच्या राजीनामा सत्रामुळे सरकार अल्पमतात आले आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकात सत्तेचे नाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे कुमारस्वामी उद्या अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार त्यांच्या कनकपुरा विधानसभा क्षेत्रातून बंगळुरुत दाखल झाले. सरकार अडचणीत सापडल्यानं उपमुख्यमंत्री जी परमेश्‍वर आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. भाजपकडून राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details