नवी दिल्ली - जनता दल युनायटेड पक्षाचे खासदार हरिवंश यांनी आज (बुधवारी) राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून(एनडीए) त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हरिवंश यांनी मागील २ वर्ष राज्यसभेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे.
जेडीयूचे खासदार हरिवंश यांचा राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज
राज्यसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसीनुसार ७ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसीनुसार, ७ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर आहे. १४ सप्टेंबरला सुरू होणारे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
सत्ताधारी एनडीए जेडीयूचे खासदार हरिवंश यांची एकमताने निवड होण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सर्व पक्षांची निवडणुकीसंदर्भात चर्चा करत असून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. मागील दोन वर्षांत राज्यसभा कामकाज व्यवस्थित चालविल्यामुळे हरिवंश यांचे सर्वच पक्षांनी कौतुकही केले आहे.