पाटणा- बिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी 38 जिल्ह्यांच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे. आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी सीतामढी, शिबिहार, मधुबनी आणि पूर्व चंपारण या चार जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली.
याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी व्हर्चुअल रॅलीचे आयोजन केले आहे. कुमार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. परंतु, कोरोनाच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाचा त्यांनी पक्षातील इतक्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. कुमार 7 पासून 12 जूनपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांशी या निवडणुकीविषयी संवाद साधणार आहेत.
या जिल्ह्यांत प्रचाराचे नियोजन -
1. 7 जूनला सीतामढी, शिवहर, मधुबनी आणि पूर्व चंपारणच्या कार्यकर्त्यांशी संवाद