महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2019, 1:57 PM IST

Updated : Jul 6, 2019, 3:26 PM IST

ETV Bharat / bharat

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत ; अकरा आमदारांनी दिले राजीनामे

राज्यातील काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले असून अकरा आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

आठ आमदार देणार राजीनामा


बंगळुरू - राज्यातील काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. सत्तारूढ पक्षाच्या अकरा आमदारांनी आज पक्ष कार्यालयात आपले राजीनामे दिल्याची माहिती सभापती रमेश कुमार यांनी दिली आहे. आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील गठबंधन सरकार निश्चितपणे पडणार असल्याची शक्यता आहे.


बीसी पाटील ,एच विश्वनाथ, नारायन गौडा, शिवराम हेब्बार , महेश कुमाथ्थली, गोपाल , रमेश जार्खीहोली आणि प्रताप गौडा यांनी इतर तीन आमदारांनी सभापतींना आपले राजीनामे दिले आहेत.

मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या होत्या. मात्र पूर्ण बहुमत भाजपाला सत्ता काबीज करता आली नव्हती. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केली. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधल्या 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढणार आहेत.

Last Updated : Jul 6, 2019, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details