नवी दिल्ली -बॉलिवुडच्या बहुचर्चीत अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवशानंतर जयाप्रदा या उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदार संघातून समाजवादी पक्षाचे कट्टर नेते आजम खान यांच्या विरोधात निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरू शकतात. जयाप्रदा यांनी २००४ मध्ये समाजवादी पक्षातून काँग्रेसविरोधात निवडणूक जिंकली होती.
मला मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. माझा जीवनातील प्रत्येक क्षण भाजपसाठी समर्पित करून पक्षात काम करणार, असे जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.
समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आजम खान रामपूर येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जयाप्रदा येथूनच निवडणूक लढवणार, असे कयास लावले जात आहेत.