मुंबई- अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत त्या उत्तर प्रदेशमधील रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या असताना आयोजित जनसभेत जया प्रदांनी विरोधी पक्षनेते आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आजम खान यांनी माझ्यावर अॅसिड टाकण्याचा प्रयत्न केला, जया प्रदांचा आरोप
रामपूर सोडण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र माझ्यावर अॅसिड टाकण्याच्या योजना आखल्या जात होत्या. आजम खान यांच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर ते त्याला तुरूंगात टाकत असत, असे त्यांनी सभेत म्हटले
रामपूर सोडण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र माझ्यावर अॅसिड टाकण्याच्या योजना आखल्या जात होत्या. आजम खान यांच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर ते त्याला तुरूंगात टाकत असत, असे त्यांनी सभेत म्हटले. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे सांगताना जया प्रदा भावूक झाल्या आणि भरसभेतच रडू लागल्या.
बुधवारी जयाप्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याआधी जयाप्रदा यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. रामपूरमधून समाजवादी पार्टीचे आजम खान हे जयाप्रदांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.