रामपूर - येथील भाजप उमेदवार जया प्रदा यांनी सप नेते आणि त्यांचे विरोधक आझम खान यांच्यावर गैरमार्गांनी निवडणुका जिंकल्या असल्याची टीका केली आहे. याआधी आझम खान यांनी रामपूर मतदार संघातील मुस्लिमांना मतदान करू न दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर जया यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आझम खान यांनी आतापर्यंत गैरमार्गांनी निवडणुका जिंकल्यात - जया प्रदा - jaya prada
'आझम खान यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे काही सुचत नसल्याने ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. याआधी त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा वापर केला आहे. मागील २० वर्षे ते बोगस मतदानाच्या आधारे निवडणुका जिंकत आहेत,' असे जया प्रदा यांनी म्हटले आहे.

आझम खान पत्रकार परिषदेमध्ये मागील एका आठवड्यात मुस्लिमांची घरे लुटण्यात आल्याचे तसेच, मुस्लिमांना मारहाण करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यावर जया प्रदा यांनी त्यांच्यावर आतापर्यंत गैरमार्गांनी जिंकत असल्याचा आरोप केला आहे. खान यांनी रामपूरमध्ये जया प्रदा यांच्याविरोधात निवडणूक लढवली. १८ एप्रिलला येथील मतदान झाले.