जयपूर -जोधपूर जिल्ह्यातील शिकारगढ लष्कर परिसरात आज (रविवार) एका जवानाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत जवानाने आत्महत्या केली. अद्याप आत्महत्या केल्याचे कारण अस्पष्ट आहे.
जोधपूरमध्ये जवानाची रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या - जोधपूर पोलीस
राजेश कुमार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. जोधपूर एअर डिफेन्स विभागामध्ये तो काम करत होता.
संग्रहित छायाचित्र
राजेश कुमार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. तो जोधपूर एअर डिफेन्स विभागामध्ये काम करत होता. रविवारी दुपारच्या वेळी आत्महत्या केली. या प्रकरणी तानाडा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह मेडिकल बोर्ड येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.