नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन कालावधी वाढविला असून 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येत्या 17 मे पर्यंत बंद राहील अशी अधिसूचना कुलसचिव प्रा. प्रमोद कुमार यांनी जारी केली आहे.
LOCKDOWN : दिल्लीतील जेएनयू 17 मे पर्यंत राहणार बंद, विद्यापीठाकडून अधिसूचना
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येत्या 17 मे पर्यंत बंद राहील अशी अधिसूचना कुलसचिव प्रा. प्रमोद कुमार यांनी जारी केली आहे.
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा. जिथे आहात, तिथेच राहा आणि विद्यापीठ प्रशासन जोपर्यंत सूचना करत नाही, तोपर्यंत विद्यापीठात येऊ नका, असे प्रमोद कुमार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेएनयू 17 मेपर्यंत बंद राहणार आहे.
दरम्यान जेएनयूमध्ये प्रवेश प्रक्रियेची तारीख 15 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.