महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2020, 8:43 PM IST

Updated : Jan 6, 2020, 10:25 AM IST

ETV Bharat / bharat

JNU : 'दिल्ली पोलीस, परत जा'; विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे.

Jawaharlal Nehru University Student Union President Aishe Ghosh at JNU
JNU : विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशा घोष यांच्यावर जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

हल्लात गंभीर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

'तोंड झाकलेल्या गुंडांनी आपल्याला बेदम मारहाण केली. माझ्या शरीरातून रक्तस्त्राव होत आहे, अशी आपबिती घोष यांनी सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजेदरम्यान काही गुंड विद्यापीठ परिसरात आले. त्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या दिशेने दगडफेक करत तोडफोड केली, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

जेएनयूएसयू अध्यक्ष आयशा घोष यांच्यावर हल्ला...

जेएनयू हिंसाचाराचे मुंबईतही पडसाद; विद्यार्थी उतरले रस्त्यावर

LIVE :

  • 3.45 AM -जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दहशत पसरवणाऱ्या गुंडांची ओळख पटवा. तसेच त्यांच्याविरुद्ध त्वरित प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करावा - जामिया समन्वय समितीची मागणी (जेसीसी)
  • 3.30 AM -जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचाराविरोधात अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यार्थ्यांनी मेणबत्तीचा निषेध केला.
  • 2.45 AM -पोलिसांनी काढलेल्या या फ्लॅग मार्चवर 'दिल्ली पोलीस, परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या.
  • 2.20 AM -विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर रात्री दिल्ली पोलिसांनी जेएनयू कॅम्पसमध्ये फ्लॅग मार्च काढला होता.
  • 2.00 AM -जवाहरलाल नेहरू टिचर्स फेडरेशनला (JNUTF) काही हिंसक आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भीती आणि क्रौर्याच्या वातावरणाबद्दल अत्यंत चिंता आहे. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या हिंसक कृत्याचा जेएनयूटीएफने निषेध केला आहे. लोक आपले मतभेद लोकशाही पद्धतीने व्यक्त करू शकतात. मात्र, विद्यार्थ्यांना हिंसाचार आणि गुन्हेगारी कारवायांसाठी भडकावू नका, असे आवाहन जेएनयूटीएफने आंदोलनकर्त्यांना आणि त्यांच्या संरक्षकांना केले आहे.
  • 1.00 AM -जवाहरलाल नेहरू टिचर्स फेडरेशनने हल्लात गंभीर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली.
Last Updated : Jan 6, 2020, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details