नवी दिल्ली :भारताला कोरोनाविरुद्ध लढाईसाठी मदत म्हणून, ५० बिलियन येन एवढे कर्ज जपान देणार आहे. देशातील आरोग्य सुविधांसाठी हे कर्ज वापरले जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील अतिरिक्त सचिव सी. एस. मोहापात्रा आणि जपानचे राजदूत सुझूकी सातोशी यांनी सोमवारी यासंदर्भातील कागदपत्रे एकमेकांना सुपूर्द केली.
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, जपानने केलेली ही मदत अगदी मोलाची ठरणार आहे. या निधीमधून रुग्णालयांमध्ये आयसीयू युनिट वाढवण्यासाठी, तसेच दुर्गम भागापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.