पाटणा -खूप दिवसांपूर्वी पप्पू यादव एकदा म्हणाले होते, की जर मी राजकारणात नसतो तर सामाजिक कार्यकर्ता झालो असतो. मात्र, नशिबाने पप्पू यादव राजकारणात आले तसेच त्यांनी सामाजिक कार्यही सुरू ठेवले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने जन अधिकारी पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांची खास मुलाखत घेतली आहे. 'मी एक अनपेक्षित क्षेपणास्त्र (मिसाइल) असून कधीही कोणावरही डागलं जाऊ शकतो', असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश सरकार पाटणा शहराची प्रतिमा बदण्यातही अद्याप यशस्वी झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
बिहारच्या राजकारणातील 'राबिनहूड'