नवी दिल्ली- आज सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदींसोबत अनेक कॅबिटेन मंत्रिही शपथ घेणार आहेत. परंतु, एनडीएचा सदस्य पक्ष असलेला जनता दल (यु) मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात फक्त जनता दलाला फक्त १ कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याने नितिश कुमार नाराज होते. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जनता दल मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, नितीश कुमारांची स्पष्टोक्ती - नवी दिल्ली
केंद्रात फक्त जनता दलाला फक्त १ कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याने नितिश कुमार नाराज होते. त्यामुळे जनता दल मंत्रिमंडळात सहभाग घेणार नाही. परंतु, जनता दल एनडीएमध्येच कायम राहणार असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
बिहारमध्ये जनता दल (यु) आणि भाजपने केलेल्या युतीने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या. यामध्ये जनता दलाचे १६ खासदार निवडून आले. काँग्रेससोबत आघाडी केलेल्या यामुळे मंत्रिमंडळात पक्षाला १ पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्रिपदे मिळावी यासाठी नितीश कुमारांसह पक्षाची इतर नेत्याचीही इच्छा होती. परंतु, भाजपकडून फक्त १ कॅबिनेट मंत्रिपद मिळत असल्याने नितीश कुमारांसह पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे, मंत्रिमंडळात सामिल न होता जनता दल (यु) एनडीएला बाहेरुन पाठींबा देणार आहे.