पणजी- गोवा सरकारने रविवारचा 'जनता कर्फ्यू' पुढील 3 दिवसांसाठी वाढवला आहे. याची काही लोकांना माहिती मिळाली नसेल, यासाठी पोलीस जागृती करत आहेत. पोलीस वाहनचालकांना सहकार्याचे आवाहन करत होते.
गोव्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सध्यातरी आढळला नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकार पावले उचलत आहे. अशातच रविवारी पंतप्रधानांनी सांगितलेल्या 'जनता कर्फ्यूला' गोमंतकीयांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू आवश्यक आहे. त्यामुळे गोवा सरकारने 25 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली आहे.
हेही वाचा -कोरोना दहशत : देशातील 19 राज्यांत पूर्णपणे लॉकडाऊन