श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज(शनिवारी) लष्कर- ए- तोयबा दहशतवादी संघटनेच्या दोन हस्तकांना अटक केली. उल्फत बशीर मीर आणि अयाझ अहमद भट या दोघांना कुपवाडा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा -हवेतील सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण भारताला ढकलतेय धोकादायक स्थितीत
या दोघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा हात असल्याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -हिंदु पद्धतीनं विवाहाचं विदेशी जोडप्याचं स्वप्न अधुरं, महिलेचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू
याबरोबर सोपोर पोलिसांनी स्थानिक नागरिकांना धमकावल्याप्रकरणी तीन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्याकडे धमकी पसरवणारा मजकूर असलेले पोस्टर आणि इतर साहित्य आढळून आले आहे. हे पोस्टर लष्कर- ए- तोयबा दहशतवादी संघटनेची असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.