श्रीनगर :जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात कोणत्याही हिंसात्मक घटना घडू नये, म्हणून सैन्य तैनात करण्यात आले आहे. आज या घटनेला १८ दिवस पूर्ण झाले आहेत. येथील जनजीवन सुरळीतपणे सुरू रहावे, यासाठी काही निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. या परिस्थितीमध्ये जनता सहकार्य करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जम्मू-काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच, लोकही दैनंदिन कामकाजानिमित्त घराबाहेर पडत आहेत. रस्त्यांवर वाहतूकही सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे.
प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच, लोकही दैनंदिन कामकाजानिमित्त घराबाहेर पडत आहेत. रस्त्यांवर वाहतूकही सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे.
५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले होते. याविषयीचे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच, लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.