महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईसाठी नियुक्त एसपीओ खुशबू जान यांची हत्या - shot dead

जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी निश्चित मासिक वेतनावर एसपीओ (विशेष पोलीस अधिकाऱ्याची) नियुक्ती केली जाते. त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जात नाही. तसेच, शस्त्रही दिले जात नाही.

एसपीओ खुशबू जान यांची हत्या

By

Published : Mar 16, 2019, 10:41 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी एका महिला विशेष पुलिस अधिकाऱ्याची (एसपीओ) गोळी घालून हत्या केली. 'दहशतवाद्यांनी खुशबू जान यांना त्यांच्या वेहिल या गावातील घरात घुसून गोळी घातली. खुशबू यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खुशबू जान यांचे कुटुंबीय हादरले आहेत,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

काश्मीरमधील शोपियान हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जाते. 'खुशबू यांना दुपारी साधारण २.४० वाजता गोळी घालण्यात आली. त्यांना गंभीर जखमी स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली,' असे पोलिसांनी सांगितले आहे. या भागात हल्लेखोरांची धर-पकड करण्याचे तसेच, परिसराला घेरण्याचे आणि कसून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी निश्चित मासिक वेतनावर एसपीओ (विशेष पोलीस अधिकाऱ्याची) नियुक्ती केली जाते. त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जात नाही. तसेच, शस्त्रही दिले जात नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details