श्रीनगर - प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ५ जणांचा अटक केली आहे. २६ जानेवारीला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांनी कट आखला होता. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, काश्मीमधून ५ दहशतवाद्यांना अटक - republic day attack plan
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशातच काश्मीर पोलिसांनी ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे.
एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चीका उर्फ इमरान, साहिल फारूक गोज्री आणि नसीर अहमद मीरचा या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांजवळून तीन पॅकेट स्फोटके, चार टेप रोल आणि एक अडीच लीटरची नायट्रिक अॅसिडची बाटली हस्तगत केली आहे. यासोबत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जिलेटिन रॉड, सात सेकंडरी एक्सप्लोसिव्ह, एक सायलेंसर, ४२ डेटोनेटर्स, एक सीडी ड्राईव्ह देखील जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रणाणात शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्येही प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसही एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे. अशातच दिल्लीमध्येही इसिस संघटनेशी संबधित तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दिल्लीतील वजिराबाद भागातून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.