श्रीनगर - जम्मू-काश्मिरमध्ये कलम ३७० लागू केल्यापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्यामळे दैनंदिन कामकाजही रखडले आहे. त्यामुळे राष्ट्रिय पँथर पक्षाकडून इंटरनेट सेवा सुरू करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. यंग पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष यशपाल कुंडल यांनी याबाबत आपल्या मागण्या सांगितल्या आहेत.
काय आहेत मागण्या -
- इंटरनेट सेवा लवकरात लवकर सुरू करावी या मुख्य मागणीसाठी राष्ट्रीय पँथर पक्षाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे.
- इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. बँकांचेही काम सुरळीत सुरू राहण्यासाठी इंटरनेट सेवा सरू करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.