महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, एका पाकिस्तानी नागरिकाला अटक - terrorists in Shopian District

जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय जवानांसोबत दहशतवाद्यांची चकमक उडाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Jammu & Kashmir: Two terrorists have been killed in Shopian District
Jammu & Kashmir: Two terrorists have been killed in Shopian District

By

Published : Mar 9, 2020, 12:39 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय जवानासोबत दहशतवाद्यांची चकमक उडाली. या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांला कंठस्नान घातले आहे. तसेच जम्मू पोलिसांनी बालाकोट सेक्टरजवळ एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे.

दक्षिण काश्मीरमधील रेबान भागातील ख्वाजापूरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. तेव्हा सुरक्षा दलांनी या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या ठिकाणी 3 ते 4 दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details