नवी दिल्ली - दिल्ली न्यायालयाने जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ इक्बाल तन्हा याला 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहरातील जामिया नगर भागात 15 डिसेंबरला झालेल्या हिंसाचारप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी जामियाच्या विद्यार्थ्याला 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी - दिल्ली हिंसाचार प्रकरण
दिल्ली न्यायालयाने जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ इक्बाल तन्हा याला 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ केलेल्या मोर्चात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आसिफ पार्शियन भाषेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी जामियाच्या विद्यार्थ्याला न्यायालयीन कोठडी
नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ केलेल्या मोर्चात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आसिफ पार्शियन भाषेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. 15 डिसेंबरला झालेल्या या मोर्चात आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. यात तब्बल चाळीस लोक जखमी झाले होते. ज्यात विद्यार्थी आणि पोलिसांचाही समावेश होता.