महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयसोलेशन वार्डमधील लोकांचा जेवणाच्या कारणावरून वैद्यकीय चमूवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - attack on medical staff in kanpur

कानपूर येथे आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या काही उत्पाती लोकांनी जेवणाचा मेन्यू दररोज बदलावा अशी मागणी करत वैद्यकीय स्टाफशी गैरवर्तन करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही घटना या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

अन्नाची फेकफाक, वैद्यकीय चमूवर हल्ला
अन्नाची फेकफाक, वैद्यकीय चमूवर हल्ला

By

Published : Apr 26, 2020, 1:49 PM IST

Updated : Apr 26, 2020, 2:59 PM IST

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये दंगे करणाऱ्या जमावाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. कानपूर येथे उपचारार्थ आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या काही लोकांनी जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल करण्याच्या कारणावरून अन्नाची नासाडी करून आरडाओरड करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच, जेवण देण्यास गेलेल्या वार्डबॉयलाही मारहाण केल्याची माहिती आहे. जेवणामध्ये असणारा मेन्यू दररोज बदलण्यात यावा, या मागणीकरता या लोकांनी तोडफोड आणि मारहाण केल्याचे पुढे आले आहे.

जेवणाच्या कारणावरून वैद्यकीय चमूवर हल्ला

कानपूर येथे आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या काही उत्पाती लोकांनी जेवणाचा मेन्यू दररोज बदलावा अशी मागणी करत वैद्यकीय स्टाफशी गैरवर्तन करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही घटना या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

माहितीनुसार, हैलटच्या कोव्हीड - १९ वार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या २० ते २५ लोकांच्या जमावाने शनिवारी संध्याकाळी जेवणातील मेन्यू बदलवण्याचे कारण पुढे करत आरडाओरड आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच, येथील वैद्यकीय चमूवर जेवणात बदल करण्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय स्टाफने हेच जेवण मिळणार असे सांगताच या जमावाने गोंधळ घालणे सुरू केले तसेच मारहाणीवर उतरले. दरम्यान, येथील वैद्यकीय चमूने तेथून पळ काढला. मात्र, त्यानंतर खूप वेळपर्यंत हा जमाव जेवणाला पायाने तुडवत, फेकफाक करत गोंधळ घालत होता.

Last Updated : Apr 26, 2020, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details