नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. 'आता आमच्या क्रिकेट आणि राजकारणावर गप्पा होणार नाहीत,' असे म्हणत जयशंकर यांनी भावना व्यक्त केल्या. जेटली यांना शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते अनेक आठवड्यांपासून आजारपणाशी झुंज देत होते.
...आता आमच्या क्रिकेट आणि राजकारणावर गप्पा होणार नाहीत - जयशंकर - arun jaitleys demise news
'जेटली यांच्या जाण्याने मला खूप दुःख होत आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवासाने एका पिढीला प्रभावित केले होते. आता आमच्या क्रिकेट आणि राजकारणावर गप्पा होणार नाहीत,' असे म्हणत जयशंकर यांनी भावना व्यक्त केल्या.
एस. जयशंकर यांनी जेटली यांच्या निधनानंतर ट्विट करत जुनी आठवण शेअर केली. 'जेटली यांच्या जाण्याने मला खूप दुःख होत आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवासाने एका पिढीला प्रभावित केले होते. आता आमच्या क्रिकेट आणि राजकारणावर गप्पा होणार नाहीत,' असे म्हणत जयशंकर यांनी भावना व्यक्त केल्या. ९ ऑगस्टला जेटली यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला होता.