नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने घाना, ट्युनिशिया, स्पेन आणि नायजेरिया देशाच्या मावळत्या उच्चायुक्त आणि राजदूत अधिकाऱ्यांसाठी दिल्लीत निरोप समारंभ आयोजित केला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या चार देशांच्या भारतातील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या सेवेबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे आभार मानले.
घाना, ट्युनिशिया, स्पेन आणि नायजेरियाच्या मावळत्या अधिकाऱ्यांसाठी निरोप समारंभ - भारतीय परराष्ट्र मंत्रालय बातमी
परराष्ट्र मंत्रालयाने घाना, ट्युनिशिया, स्पेन आणि नायजेरिया देशाच्या मावळत्या उच्चायुक्त आणि राजदूत अधिकाऱ्यांसाठी दिल्लीत निरोप समारंभ आयोजित केला होता.

एस. जयशंकर
ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, न्यूझीलँड, सिंगापूर, रवांडा, स्वित्झर्लंड, माल्टा आणि बोट्स्वाना या देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांची नुकतीच भारतात नियुक्ती झाली आहे. त्यांचेही परराष्ट्र मंत्र्यांनी स्वागत केले. तसेच घाना, ट्युनिशिया, स्पेन आणि नायजेरिया देशांच्या कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवेबद्दल आभार मानले.