नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशाचे परराष्ट्र व्यवहार कमकुवत होत चालल्याची टीका केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर प्रसाद यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे.
'देशाचे परराष्ट्र संबंध मजबूतच'; जयशंकर प्रसादांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर.. - जयशंकर प्रसाद परदेश संबंध
राहुल गांधींनी देशाचे परराष्ट्र व्यवहार कमकुवत होत चालल्याची टीका केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर प्रसाद यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मोठ्या देशांशी असलेले भारताचे संबंध अजूनही मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशिया, चीन, जपान आणि अमेरिका सारख्या देशांशी आपले चांगले संबंध असून, आपण वेळोवेळी परिषदा आणि चर्चा सत्रे आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या काळातच चीन आक्रमक झाला आहे, म्हणजेच मोदींचे परराष्ट्र धोरण चुकत आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. यावर परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. जयशंकर यांनी एक एक करत राहुल यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. तसेच, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारतचे परराष्ट्र संबंध कसे सुधारले आहेत याबाबतही त्यांनी सांगितले.