जैशचा दहशतवादी अब्दुल माजिदला श्रीनगरमधून अटक, १२ वर्षांपासून होता 'वॉन्टेड' - arrest
माजिद याच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पोलिसांनी त्याला श्रीनगर येथून अटक केली. तो जम्मू-काश्मीच्या सोपोर जिल्ह्यातील रहिवासी होता. पोलीस उपायुक्त संजीव यादव यांनी ही माहिती दिली.
![जैशचा दहशतवादी अब्दुल माजिदला श्रीनगरमधून अटक, १२ वर्षांपासून होता 'वॉन्टेड'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3277540-652-3277540-1557825114140.jpg)
नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी अब्दुल माजिद बाबा याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली. स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत १२ वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्या नावावर २ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. २००७ मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात तो 'वॉन्टेड' होता.
माजिद याच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पोलिसांनी त्याला श्रीनगर येथून अटक केली. तो जम्मू-काश्मीच्या सोपोर जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याच्यासाठी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत होती. अखेर त्याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त संजीव यादव यांनी ही माहिती दिली.
माजिद याला पकडण्यासाठी पोलिसांद्वारे सेल तांत्रिक सेवेसह खबऱ्यांचाही वापर करण्यात आला. डाऊन टाऊन या भागातून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशमध्ये अब्दुल माजिद याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला जैशच्या सर्व कारस्थानांची माहिती असते. स्पेशल सेलच्या दृष्टीने त्याची अटक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या चौकशीतून जैशचे नेटवर्क, कारस्थाने आणि सक्रिय दहशतवाद्यांविषयी बरीच माहिती मिळू शकते.