महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जयपूरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

चारदीवारी परिसरात चौडा रस्त्यालगत असलेल्या एका घरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आहे. यामुळे घराचा काही हिस्सा कोसळला असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jaipur-cyllender-blast-3-burried-house-collapses
जयपूरमध्ये सिलेंडचा भयानक स्फोट...

By

Published : Mar 2, 2020, 10:54 AM IST

Updated : Mar 2, 2020, 11:00 AM IST

जयपूर- चारदिवारी परिसरात चौडा रस्त्यालगत असलेल्या एका घरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आहे. यामुळे घराचा काही हिस्सा कोसळला असून त्याखाली काही व्यक्ती अडकले होते. यातील दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

हेही वाचा-#दिल्ली हिंसाचार : गोकुळपूरी अन् भगीरथीविहार कालव्यामध्ये आढळले 3 मृतदेह

ताडकेश्वर मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या घरात हा स्फोट झाला. एक महिला घरात चहा बनवित होती. दरम्यान, अचानक हा स्फोट झाला आहे. या भयानक स्फोटाने घराचा मोठा भाग कोसळला आहे. त्याखाली घरातील काही व्यक्ती अडकले होते. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी बचाव मोहीम हाती घेतली होती.

Last Updated : Mar 2, 2020, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details