जयपूर -२००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर, एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
१३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते.