जयपूर - राजस्थानातील मयंक प्रताप सिंह हा वयाच्या 21 व्या वर्षीच विधी सेवा परीक्षा २०१८ उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे हा देशातील सर्वात कमी वयाचा तरुण न्यायाधीश बनला आहे.
राजस्थानातील मयंक सिंह बनला देशातील सर्वांत तरुण न्यायाधीश
राजस्थानातील मयंक सिंह हा वयाच्या 21 व्या वर्षीच विधी सेवा परीक्षा २०१८ उत्तीर्ण झाला आहे.
समाजातील न्यायाधीशांचे महत्त्व आणि त्यांना मिळालेला आदर मला नेहमीच आकर्षित करत होता. 2014 मध्ये, राजस्थान विद्यापीठात मी एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला. हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला. मी यशामुळे खूप आनंदीत आहे. माझे कुटुंब, शिक्षक आणि हितचिंतक यांचे मी आभार मानतो. माझ्या यशामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे, त्यांच्यामुळेच मी पहिल्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो, असे मयंकने म्हटले.
विधी सेवा परीक्षेत बसण्याचे वय किमान वय 23 वर्षे होते. जे राजस्थान उच्च न्यायालयाने परीक्षेची वयोमर्यादा घटवून यंदा 21 वर्षांवर आणले. या परीक्षेतील पहिल्या प्रयत्नात यश मिळवून मयंक याने विधी सेवेच्या इतिहासात नाव नोंदवले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने वयाची मर्यादा कमी केल्यामुळेच मी या परीक्षेला बसू शकलो. जर तसे झाले नसते, तर मी या परीक्षेला बसण्यास पात्र ठरलो नसतो, अश्या भावना मयंकने व्यक्त केल्या आहेत.