कोलकाता - नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी भाजपवर हल्लाबोल केला. 'जय श्रीराम'च्या नाऱ्याचा वापर लोकांना मारहाण करण्यासाठी केला जातोय, असा आरोप त्यांनी केला आहे. जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
कोलकातामध्ये बंगाली संस्कृती आहे. येथे माँ दुर्गाची पूजा केली जाते. मात्र आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. 'जय श्री राम' च्या नाऱ्याचा बंगाली संस्कृतीशी फारसा संबध नाही. मात्र, आता केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी या नाऱ्याचा वापर केला जात आहे, असे अमर्त्य सेन म्हणाले.