हैदराबाद -आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची मतमोजणी करण्यात येत आहे. सध्याच्या कलानुसार वायएसआर काँग्रेस १५२ जागांवर आघाडीवर आहे. यावरुन वायएसआर काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. जगनमोहन रेड्डी हे ३० मे रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती उमारेड्डी व्यंकटेश्वरलू यांनी दिली.
आंध्र प्रदेश : जगमोहन रेड्डी ३० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ - oath
जगनमोहन रेड्डी हे ३० मे रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती उमारेड्डी व्यंकटेश्वरलू यांनी दिली.

आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या १७५ जागांवर मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार आंध्रात चंद्राबाबूंच्या पक्षाचा धुव्वा उडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे वायएसआर काँग्रेस सत्तेवर आपला दावा सांगणार असून जगमोहन रेड्डी ३० मे रोजी मुख्यमंत्रीपदीची घेणार शपथ आहेत.
आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात चंद्राबाबू नायडू यांना अपयश आले. काँग्रेससोबत आघाडी न केल्याने त्यांच्या मतांचे विभाजन झाले. या सर्व कारणामुळे चंद्राबाबूंना पराभवाचा सामना करावा लागत आहे.